मिथुन राशीचे लोक विनम्र, बुद्धिमान आणि विनोदी असतात. त्यांना नवीन माहिती मिळवण्यात, लेखन, गणित आणि कलात्मक कार्यात विशेष रस असतो. त्यांची सर्वात मोठी कमकुवत बाजू अशी आहे की ते त्वरीत इतरांच्या प्रभावाखाली आणि आकर्षणाखाली येतात.
पॉजिटिव्ह
या वर्षी तुम्ही अनेक नवीन कामांची योजना कराल आणि प्रगती आणि यशही मोठ्या प्रमाणात मिळेल. प्रभावशाली लोकांचे सहकार्य राहील. कौटुंबिक सुख शांतीच्या दृष्टीने हे वर्ष खूप चांगले राहील. घरातील वडिलधाऱ्यांच्या मार्गदर्शनाने तुमचे काम बर्याच अंशी सोपे होईल. भाऊ किंवा नातेवाइकांशी संपत्तीचे वाद मिटवण्यासाठी चांगला काळ राहील. नात्यात पुन्हा गोडवा येईल. कठोर परिश्रमाने, प्रतिकूल परिस्थितीला आपल्या बाजूने करण्याची क्षमता तुमच्याकडे असेल.
निगेटिव्ह
संपूर्ण वर्षभर जास्त मेहनत आणि धावपळ होईल. काही वेळा घाईने घेतलेले निर्णय चुकीचे ठरू शकतात. प्रत्येक कामात खूप विचार करावा लागेल. मुलांच्या शिक्षणाच्या आणि करिअरच्या बाबतीत काही अडचणी येऊ शकतात. मात्र, कोणाच्या तरी सहकार्याने कामे पूर्ण होतील. तरुणांनी चुकीच्या लोकांपासून अंतर राखणे आवश्यक आहे. अन्यथा तुम्ही अडचणीत येऊ शकता. जेव्हा कर्ज घ्यायचे असेल तेव्हा तुमच्या क्षमतेपेक्षा जास्त कर्ज घेण्याचा प्रयत्न करू नका.
व्यवसाय
व्यावसायिक दृष्टिकोनातून २०२२ हे वर्ष तुमच्यासाठी प्रगतीसोबतच यशाचे ठरेल. अधिकारी आणि राजकीय लोकांशी संपर्क मजबूत करा. ह्या व्यक्ती तुमच्यासाठी फायदेशीर ठरतील. काहीवेळा व्यवसायात घाईघाईने घेतलेले निर्णय चुकीचे ठरू शकतात. कोणतीही व्यवसाय गुंतवणूक करण्यापूर्वी, आपले संशोधन पूर्ण करा. यावर्षी कोणतीही आर्थिक जोखीम घेणे तुमच्यासाठी योग्य नाही. सरकारी नोकरी करणाऱ्यांनी कोणत्याही प्रकारची जोखीम घेणे टाळावे. बेकायदेशीर कामात रस घेऊ नका.
प्रेम
या वर्षात अशा काही घटना घडतील, ज्यामुळे तुम्हाला आपली आणि परकी माणसे यांची पारख होईल. याच वेळी मात्र कुटुंबात सलोखा राहील. परिवार आणि जोडीदार यांच्याकडून प्रेम आणि सहकार्याची भावना राहील. या वर्षात तुमच्या समोर नवीन प्रेम प्रस्ताव येतील पण त्या प्रस्तावांचे विचार करत असताना तुमच्या सन्मानाची आणि प्रतिष्ठेची काळजी नक्की घ्या. मनोरंजन आणि प्रवास या संबंधी कार्यक्रम केले जातील.
आरोग्य
वर्षाच्या मध्यात तब्येतीची विशेष काळजी घ्या. अपचन, बद्धकोष्ठता आणि पोट बिघडणे यासारख्या समस्या वाढू शकतात. एखादी लहान मोठी शस्त्रक्रिया होण्याचीही शक्यता आहे. व्यस्त असूनही व्यायाम, योगासने आणि ध्यानासाठी थोडा वेळ काढा. या काळात नैसर्गिक उपाय केल्याने तुम्ही निरोगी आणि ऊर्जावान राहाल.