एका आठवड्यानंतर डॉ.शेजवळ देखील परत आले आणि महादूने काही मजुरांचीही व्यवस्था केली. मग उत्खननाचे काम जोमाने सुरू झाले.

दोन -तीन दिवसांच्या उत्खननानंतर बौद्ध आश्रमाचा खालचा मजला समोर आला. दालन, अंगण आणि खोल्या सर्व पांढरे आणि लाल संगमरवरी बनलेले होते.  खोल्या पूर्णपणे स्वच्छ आणि लख्ख होत्या. असे भासत होते की स्वच्छता दररोज चालू आहे. त्या खोलीत एक अवर्णनीय सुगंधही पसरला होता . मधली खोली तुलनेने भव्यदिव्य होती.


त्याच्या संगमरवरी भिंतींवर भगवान बुद्धांचे संपूर्ण जीवनपट कोरलेला होता. खोलीत शिरताच माझे शरीर आणि मन उल्हासित झाले. प्रचंड शांततेची भावना होती. बराच वेळ आतुरतेने खोलीत उभा राहिलो. अचानक असे वाटले की कोणीतरी मला गंभीर पण मृदू आवाजात हाक मारत आहे. मी आश्चर्याने आजूबाजूला पाहिले, पण तिथे कोणीच नव्हते. फक्त शांतता होती, स्थिरता होती आणि नीरव प्रसन्नता होती. मग मी दुसऱ्या खोलीत गेलो ; तिथे सर्व काही होते, पण शांतता नव्हती.


मी परत जाण्याचा विचार करत होतो तेव्हा डॉ. शेजवळ यांचा आवाज ऐकला. "गोस्वामी! गोस्वामी! इकडे या."

शेजवळ साहेब एका छोट्या शेजारच्या खोलीत होते. मी तिथे पोहचल्यावर त्यांनी समोरच्या दिशेने बोट दाखवले आणि म्हणाले, "पाहा! हे काय आहे?”


खोलीच्या भिंतीला लागून भगवान तथागताची एक अतिशय भव्य दगडी मूर्ती बसवण्यात आली होती. भगवान बुद्धांची अभय मुद्रा होती. त्याच्या चेहऱ्यावर चीर परिचित शांतता आणि सौम्यतेची एक प्रखर आभा होती. मूर्ती सुमारे तीन फूट उंच होती. पुतळ्यावर सरकत सरकत माझी नजर अचानक एका वस्तूवर अडकली.  तथागतांच्या कमलासनस्थ प्रतीमेजवळ ती वस्तू ठेवण्यात आली होती आणि त्याच्या वरच्या बाजूला अस्पष्ट अक्षरे लिहिलेली होती. "शांतीचे दूत भगवान तथागत यांच्या चरणी सप्रेम अर्पण - चंद्रकांत जोशी”


माझे संपूर्ण शरीर एकाच वेळी थरथरले आणि त्याबरोबर त्या तरुणाचा चेहराही माझ्या डोळ्यांसमोर ओझरता गेला. पेटी तोडून उघडली गेली. आतमध्ये एका मृगजीनात गुंडाळलेले दर्शनशास्त्राचे हाताने लिहिलेले जाड पुस्तक सापडले आणि त्यासोबत गुंडाळलेल्या कागदांचा एक गठ्ठाही सापडला, ज्याच्या वर ठळक अक्षरात लिहिलेले होते “चंद्रकांत जोशी याची  जीवनगाथा.”

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel