• प्रोफेसर X- इम्पेरीयन ग्रहावरील महाकाल प्रजातीचा एक परग्रहवासी आहे. जो संपूर्ण ब्रम्हांडात त्याच्या अंकाया या अवकाशयानातून मुक्तपणे संचार करतो आणि संकटात सापडलेल्या ग्रहावरील इतर प्रजातींना मदत करतो आणि सभ्यता नष्ट होण्यापासून वाचवतो. पृथ्वीशी याचे एक विशेष नाते आहे त्यामुळे तो अनेक वेळा पृथ्वीवर काही विशिष्ट लोकांनाच भेटतो.
  • इम्पेरीयन : इम्पेरीयन हा पृथ्वीपासून ३४१ दशलक्ष प्रकाशवर्ष इतक्या अंतरावरील नेबेसा नावाच्या तारामंडलातील एक ग्रह आहे.
  • महाकाल: इम्पेरीयन ग्रहावरील सर्वात शक्तिशाली प्रजाती. महाकाल नावाच्या या मानव सदृश्य प्रचंड विकसित प्रजातीने अंतराळ आणि काळ यांच्यावर विजय मिळवला आहे. ते त्यांच्या अंतराळ काळ यानातून ब्रम्हांडात कुठेही आणि कोणत्याही वेळी भ्रमण करू शकतात.
  • अंकाया : अंतराळ काळ यान ! हे एक अत्याधुनिक तंत्रज्ञान आहे. याच्या सहाय्याने ब्रम्हांडात कुठेही आणि कोणत्याही वेळी भ्रमण करणे शक्य आहे. अंकायाच्या आतील आकार हा बाहेरील आकारापेक्षा मोठा आहे. त्याच्या आतील आकाराचे क्षेत्रफळ अमर्याद आहे. प्रोफेसरचा अंकाया पृथ्वीवरील एका फूड ट्रक सारखा दिसतो.
  • eon1100 : प्रोफेसरचा षटकोनी फोन ज्याच्यामध्ये आपण विचारही केला नसेल अशा सोयी उपलब्ध आहेत.
  • लेझर स्टायलस : eon1100 चा स्टायलस म्हणजे टचस्क्रीन मोबाइलवर लिहिण्यासाठी वापरण्यात येणारे पेन.  जणू  काही जादूची कांडीच.
  • प्लास्टिकॉन : हा एक ग्रह आहे जो पृथ्वीपासून १६० दशलक्ष प्रकाशवर्षे दूर आहे.
  • मदर रडार : ही प्लास्टिकॉन ग्रहावर पाऊल ठेवणारी पहिली रडार प्रजातीची जीव म्हणजेच इम्पेरीयन ग्रहावरील दुय्यम रडार प्रजातीची मादी. महाकाल प्रजातीने इम्पेरीयन ग्रहावर सत्ता स्थापन करताना रडार प्रजातीची वंशहत्या केली होती. तेव्हा मदर रडार निसटून प्लास्टिकॉनवर जाऊन राहिली होती. निसटण्यासाठी तिला प्रोफेसरने मदत केली होती. त्यामुळे प्रोफेसर आणि मदार रडार मध्ये मैत्री आहे.
  • पॉलीमोरॉन : प्लास्टिकॉन ग्रहावर निसटून गेल्यानंतर मदर रडार हिने प्लास्टिकशी स्पर्शसंभोग करून पॉलीमोरॉन या मानव सदृश्य प्लास्टिकच्या प्रजातीला जन्म दिला आणि एक अत्यंत कुशल चिकाटी असलेली सभ्यता निर्माण केली. सायक्रॉक्स : हे प्लास्टिकॉन ग्रहावरील मुलनिवासी प्रजाती..अत्यंत अविकसित असलेले प्रचंड मोठ्या विंचवाच्या आकाराचे हे उभयचर प्राणी आहेत. ज्यांचे बाह्यकंकाल केसिनच्या कमकुवत प्लास्टिक पासून बनलेले असते. पॉलीमोरॉनच्या उदयानंतर ह्यांनी त्यांच्यावर बरीच आक्रमणे केली आणि यांची संख्या बरीच कमी होऊन ते नामशेष होण्याच्या मार्गावर होते. ५२३ वर्षांपूर्वी सायक्रॉक्सच्या बाह्यकंकालास संसर्ग करणारा विषाणू “प्लास्टिक इटर व्हायरस” यांचे संक्रमण पॉलीमोरॉन्स मध्ये देखील पसरले.
  • धुमकेतू पोलीस डीपार्टमेंट : ही अवकाशातील महाकाल साम्राज्याने नेमलेली पोलीस डीपार्टमेंट आहे. त्यांची पोलीस स्टेशन ही प्रत्येक धुमकेतूवर असतात.

 

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.

Books related to प्रोफेसर X- प्लास्टिक


What is darknet?- in marathi डार्कनेट
सायनाईड
An amazing indian air force mission- in marathi
मराठी कविता
Mala umajlele Krishnamurthi. Questions and Answers by Krishnamurthi.
Philosophy of J Krishnamurthi as explained by Prabhakar Patvardhan