रॉबर्ट एरिक वॉन हत्येच्या वेळी वॉशिंग्टन, डीसी येथे राहत होता. वोन बत्तीस वर्षांचा होता.

तो व्हर्जिनियाच्या ऑक्टन येथे राहात होता. तेथेच त्याने वकील म्हणून काम करण्यासाठी वॉशिंग्टन डी.सी. येथे घर मिळवले होते. त्याच्या हत्येच्या रात्री वॉन काही मित्रांबरोबर होते. जे त्यांच्या डी.सी येथील कार्यालयापासून अवघ्या काही मैलांच्या अंतरावर राहत होते.

ऑगस्ट, २००६ मध्ये हल्ला झालेल्या वेळी वॉन राहत असलेले टाऊनहाऊस रिकामे नव्हते. तसेच हल्ल्याच्या वेळी वॉनच्या घरात व्हिक्टर झबोर्स्की, जोसेफ प्रिन्स आणि डिलन वार्ड पण होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत्यूच्या रात्री वॉनला चाकूने ठार मारण्यापूर्वी त्याने मारेकऱ्यांशी झटापट केली होती. शिवाय वॉनला त्यांनी अपंग केले होते आणि वॉनवर लैंगिक अत्याचार केल्याच्याही खुणा होत्या.

घरात राहणाऱ्या तिघांची पोलिसांनी चौकशी केली. आणि त्यांचे अवाजवी शांत वर्तन पोलिसांना संशयास्पद वाटले.

त्या माणसांनी रुग्णवाहिका बोलावली होती. परंतु, ते पॅरामेडिक्सला आल्यावर या विषयाबद्दल बोलण्यास किंवा मदत करण्यास उत्सुक दिसत नव्हते.

हे लोक हत्येचे संशयी ठरले. त्यांच्या समलैंगिकतेमुळे आणि मृत्यूपूर्वी वॉनवर लैंगिक हस्तक्षेप केला गेला या कारणास्तव पुष्कळांना त्यांचा सहभाग असल्याचा संशय होता. शेवटी पोलिसांना गुन्ह्याच्या ठिकाणी छेडछाड केल्याचे आढळले ज्यामुळे तपासणीस अधिक विलंब झाला.

त्या तिघांनी या तपासात खोडता घालण्याचा प्रयत्न केला. तिघेही दोषी आढळले नाहीत. नंतर वॉनच्या पत्नीने त्या तिघांवर वॉनवर अतिप्रसंग करून मारल्याचा म्हणजेच “राँगफुल डेथ”चा दिवाणी खटला दाखल केला होता.

आश्चर्यकारकरित्या हे प्रकरण ३ ऑगस्ट,२०११ रोजी दाबलं गेलं आणि प्रकरण दाबण्यासाठी आलेला खर्च आज तागायत कुणालाही माहिती नाही.

रॉबर्ट वॉनची हत्या हे रहस्य कधीच उलगडले नाही. शिवाय, वॉशिंग्टन, डी.सी.मध्ये विशेषतः समलिंगी समुदायाच्या सहभागामुळे हे प्रकरण बरेच लोकप्रिय बनले होते.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel