मोबाईलवर बोलत असताना किंवा फोन केल्यावर कधीकधी आपल्याला ज्यांच्यासोबत बोलायचे आहे, त्याच्यासोबत नाहीतर त्याच्या ऐवजी भलत्याच कुणाचा तरी आवाज ऐकू येतो. आपण इथून काय बोलत आहोत हे बऱ्याचदा समोरच्या व्यक्तीला ऐकू जात नाही, पण ती व्यक्ती काय बोलत आहे, हे आपल्याला ऐकू येते. तेव्हा 'अरे यार... क्रॉस कनेक्शन लागलं...' असा निष्कर्ष काढून आपण फोन कट करतो आणि पुन्हा नंबर डायल करतो.

https://qphs.fs.quoracdn.net/main-qimg-81f764769898b411c3f1153e1c90a292

मोबाइल कम्युनिकेशनमध्ये प्रत्येक कॉलसाठी फ्रिक्वेन्सी बँडचा एक विशिष्ट भाग 'कार्यक्षम कम्युनिकेशन' (Efficient Communication) म्हणून दिला जातो. परंतु कधीकधी जेव्हा दोन जवळजवळ समान फ्रिक्वेन्सीचे संकेत हवेच्या माध्यमात हस्तक्षेप (interfere) करतात तेव्हा क्रॉस कनेक्शन लागतो.

उदाहरण द्यायचे झाले तर,

  • पत्ता क्र. 1 - पाटील निवास, सेनापती बापट मार्ग, मुंबई - 40
  • पत्ता क्र. 2 - पटेल निवास, सेनापती बापट मार्ग, मुंबई - 40

डिलिव्हरी बॉयला एक पार्सल पहिल्या पत्त्यावर वितरित करायचे होते परंतु पत्त्यात कमी फरक असलेल्या जवळजवळ समान पत्त्यावर ते बदलले गेले. कॉलिंगसाठी वापरले जाणारे फ्रिक्वेन्सी बँड इतके कमकुवत नसतात. पण कधीतरी असं होऊ शकतं.

आता एका वाक्यात उत्तर, कॉल करत असताना कोणत्याही सिग्नलमधील इलेक्ट्रिकल किंवा ऑप्टिकल हस्तक्षेपामुळे (interference) क्रॉस कनेक्शन होतं. आणि आपले मोबाईल सिग्नल इलेक्ट्रो-मॅग्नेटिक फ्रिक्वेनीवर कॉल कनेक्ट करते. तर जसं त्या डिलिव्हरी बॉयला समजून घेता, तसं डोळ्यांना न दिसणाऱ्या फ्रिक्वेन्सी बँडला समजून घ्या.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel