ही गाडी जगातील सर्वात विलासी आणि सर्वसोयींयुक्त रेल्वेगाड्यांपैकी एक आहे. आपलं नाव सार्थ करणारी ही गाडी अंतर्बाह्य आकर्षक आहे. ही गाडी सर्वोत्तम प्रकारच्या सुविधांनी भरलेली आहे. ह्या गाडीतील आलिशान खोल्यांमध्ये अद्ययावत सुविधा अाहेत. फ्रि वाय-फाय, एल.सि.डी टेल्हीवीजन सेट आहे. स्वुईटमध्ये विंटेज फर्निचर आहे. स्वुईटच्या जमिनीवर या भिंतीपासून ते त्या भिंतीपर्यंत कार्पेट अंथरलेले आहे. झोपायच्या बेडवर उच्च प्रतिच्या रेशीमाची अंथरुण पांघरुण आहेत. त्या स्वुईटच्या भिंतींवर सुंदर चित्रे आहेत. चोविस तास सेवेसाठी स्टाफ. प्रत्येक स्वुईटमध्ये वैयक्तिक ए.सी कंट्रोलर दिला आहे म्हणजे आपापल्या सोयीनुसार पर्यटक ए.सीचे सेटींग बदलु शकतात. त्यामुळे अनेक पर्यटकांना आपल्या घरी असल्याप्रमाणे आराम वाटतो. या ट्रेनमध्ये पर्यटकांना भारतीय तसेच जगातील अनेक स्वादिष्ट, रुचकर पदार्थांची मेजवानी असते. ही मेजवानी सोन्या-चांदीच्या ताटांमध्ये वाढली जाते. त्या ट्रेनमध्ये स्वरोवस्की ग्लासांमध्ये पेय आणि सरबते दिली जातात. उत्तर भारताच्या विविध ऐतिहासिक स्थळांद्वारे ही गाडी पर्यटकांना भारताच्या समृद्ध इतिहासाचा साक्षीदार करते.

महाराजा एक्सप्रेसचा मार्ग

महाराजा एक्सप्रेसचा मार्ग नेहमी चार मार्गावर फिरता आसतो. दर महिन्याला वेगळ्या मार्गावरून हि गाडी फिरते.

इंडियन स्पेन्डोर- दिल्ली- आग्रा- रणथंबोर- जयपूर- बिकानेर- जोधपुर- उदयपुर- मुंबई (2767 कि.मी.)

हि एक आठवड्याची सहल म्हणजे अगदी एका सहलीत संपूर्ण भारताचे दर्शन करण्यासारखी आहे. या मध्ये ताज महाल , रणथंबोर राष्ट्रीय उद्यान, जयपूरचे समृद्ध वैभव, बिकानेरचे उंदिराचे देऊळ, जोधपुर आणि उदयपूरचे वळवंट, हिरवेगार प्रदेश या सगळ्याची मेजवानी मिळते. सगळ्यात शेवटचे ठिकाण म्हणजे मुंबई जिथे विविध भाषा, संस्कृती, इतिहास आणि चित्रपटसृष्टी यांचा मेळ आहे.

याचे एका माणसाचे तिकीट किती?

हे तिकीट एका माणसाच्या हिशोबाने दिले आहे. यामध्ये  जी.एस.टी जादाचा पकडावा. यामध्ये दिलेले तिकिटाचे दर सीजन नुसार बदलू शकतात. शिवाय नववर्ष साजरे करण्यासाठी किंवा नाताळ साजरा करण्यासाठी आशय विशेष दिनी प्रत्येक व्यक्तीमागे  यु.एस. डॉलर जादाचे लागतात. 

केबिन प्रकार

प्रती व्यक्ती

सिंगल सप्लीमेंट

डीलक्स

यु.एस. डी. 5980

यु.एस. डी. 4510

ज्युनियर सूट

यु.एस. डी.9460

यु.एस. डी. 8520

सूट

यु.एस. डी. 13800

यु.एस. डी. 13800

प्रेसिडेन्शियल सूट

यु.एस. डी. 23700

यु.एस. डी. 23700

 

द हेरीटेज ऑफ इंडिया- मुंबई- उदयपुर- जोधपुर- बिकानेर- जयपूर- रणथंबोर- फतेपूर सिक्री- आग्रा- दिल्ली.-(3285 किमी)

केबिन प्रकार

प्रती व्यक्ती

सिंगल सप्लीमेंट

डीलक्स

यु.एस. डी. 6340

यु.एस. डी. 4840

ज्युनियर सूट

यु.एस. डी.9890

यु.एस. डी. 8930

सूट

यु.एस. डी. 13800

यु.एस. डी. 13800

प्रेसिडेन्शियल सूट

यु.एस. डी. 23700

यु.एस. डी. 23700


द इंडिअन पॅनोरमा - दिल्ली- जयपूर- रणथंबोर- फतेपूर सिक्री- आग्रा- ओरछा-खजुराहो-वाराणसी-दिल्ली-(2307 किमी) 

या मार्गाची विशेषता म्हणजे वाराणसी या भारतातील सगळ्यात जुन्या हिंन्दु शहराची आणि गंगेची सफर करायला मिळते.

केबिन प्रकार

प्रती व्यक्ती

सिंगल सप्लीमेंट

डीलक्स

यु.एस. डी. 5980

यु.एस. डी. 4510

ज्युनियर सूट

यु.एस. डी.9460

यु.एस. डी. 8520

सूट

यु.एस. डी. 13800

यु.एस. डी. 13800

प्रेसिडेन्शियल सूट

यु.एस. डी. 23700

यु.एस. डी. 23700

 

ट्रेजर्स ऑफ इंडिया- दिल्ली- आग्रा- रणथंबोर- जयपूर- दिल्ली (859 कि.मी.)

या प्रवासात भारताचा जवळपास ६००० वर्षांपूर्वीचा किंवा अधिक जुना इतिहास दाखवला जातो. भारत म्हणजे राजा महाराजांची भूमी  आणि त्याचा समृद्ध इतिहास यामध्ये दाखवला जातो. हा मार्ग विशेषतः “सुवर्ण त्रिकोण” म्हणूनही ओळखला जातो.

केबिन प्रकार

प्रती व्यक्ती

सिंगल सप्लीमेंट

डीलक्स

यु.एस. डी. 3850

यु.एस. डी. 2910

ज्युनियर सूट

यु.एस. डी.4950

यु.एस. डी. 4460

सूट

यु.एस. डी. 7600

यु.एस. डी. 7600

प्रेसिडेन्शियल सूट

यु.एस. डी. 12900

यु.एस. डी. 12900

 

 या सफरीचा आनंद लुटायचा असेल तर ऑनलाईन बुकिंग करा आणि आनंद घ्या भारताच्या समृद्ध इतिहासाचा.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel