〰️ प्रवास 〰️

नशीब आजमावण्यास मुंबई
स्वप्ननगरी गाव सोडूनी गेलो
पाहूनी भूल भुलैयी दुनियेस
एकदम मी भारावूनी गेलो

ओळखीचे इथे कुणीच नाही
मिळेना राहण्या कुठे ही निवारा
फुटपाथवर मग घेतला आसरा
गगनतळ हेच मग बनले सहारा

नोकरीसाठी पळू लागलो सैरावैरा
नोकरीने दिली हुलकावणी कैकदा
छोटेमोठे काम करू लागलो आता
उपाशीच झोपावे लागले अनेकदा

ब-यापैकी नोकरी करू लागलो
मिळाली कलाटणी जीवनाला
भाड्याच्या घरात संसार मांडला
केली सुरूवात नव जीवनाला

तोच कोरोनाने थैमान मांडला
या महामरीने जीव बेजार झाला
स्वप्न सुखांची मग झाली होळी
जपलेला पैसा आता संपू लागला

घरभाडे परवडेना,गेली नोकरी
मायावी मुंबईचा विचार सोडला
पाऊले चालली घरच्या दिशेला
जगण्याच्या ओढीने गाव गाठला

शेतात पाऊल ठेवताच आठवला
आतापर्यंचा हा जीवन प्रवास
करून माय मातीला प्रणाम
पुन्हा नव्याने सुरू केला प्रवास


सौ.संगिता वैभव कांबळे
महाड
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
आमच्या टेलिग्राम ग्रुप वर सभासद व्हा. इथे तुम्हाला इतर वाचक आणि लेखकांशी संवाद साधता येईल. telegram channel