श. १४९७ फाल्गुन व. १४
इ. १५७६ फेब्रु. २८
[वाटोळ्या फार्शी शिक्यांत] १०४२ .... बिन काजी हुसैन खादिम शरअ हैफर अलीमुस्तकवी [व त्याखालीं] नकलुलं अस्ल ताळिक
यासि साख रामेस्वर व चीवनेस्वर व हेलेस्वर
स्वस्ती श्री सके १४९७ युवा संवसरे फालगुण वद चतुर्दशी सोमे ते दिनी रामाजी वाघो पंडित देसाई मामले मुर्तजाबाद उरुक चेऊलु सु॥ सति सर्बेन व तिसा मय्या कारणे आपाजी माहादप्रभु देसाईं कुलकरणी मामलें मजकरु यासि लेहोनु दिधले यैसे जे आजचे दिवसापासुनु येकोपा केला तो पुढें उतरोतर चालवणे जे काही दिवाणकाम असेल ते तुमचे तुम्ही खावे व आमचे आम्ही खावे यापुढे तुम्ही व आम्ही ततबीरकरितां जे काही दिवाणीतुनु वेतन काढुनु ते अर्ध तुमचे व अर्ध आमचे व नवगाव पालणुक पटिया आजाजीत काढून ते आपले तुमसी निसबती नाही दिसमधें खर्चवेच व जे पडेल पेसजी चालते तेण्हेप्रमाणे चालवणे येक येकाचे बरे वाइटास येक येकास अंतर न देणे मदत करणे येक येकाची चाहाडी करी तो माहाराचे वीर्याचा सहस्त रामाजी वाघोपंत देसाई [फा. मोर्तब]
साखे
पत्रप्रमाणे साखे मालोबा सेटिया
पत्रप्रमाणे सासे दामाजी बाबजीप्रभु
पत्रप्रमाणे साखे देउजी गागप्रभु
[पत्रामागें 'आपाजी व रामाजी यांचे येकोपेयाचे पत्र' हा शेरा]

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel