जय देव जय देव दत्ता अवधूता ।  साई अवधूता ।
जोडुनि कर तव चरणीं ठेवतों माथा ।  जय देव जय देव ।। धु ।।

अवतरसी तूं येतां धर्मातें ग्लानी ।  नास्तिकांनाही तू लाविसि निजभजनीं ।
दाविसि नाना लीला असंख्य रुपांनीं ।  हरिसी दीनांचें तू संकट दिनरजनी ।। ज0 ।। 1 ।।

यवनस्वरुपीं एक्या दर्शन त्वां दिधलें ।  संशय निरसुनियां तदद्घैता घालविलें ।
गोपीचंदा मंदा त्वांची उद्घरिलें ।  मोमिन वंशीं जन्मुनि लोकां तारियल ।। ज0 ।। 2 ।।

भेद न तत्वीं हिंदूयवनांचा कांहीं ।  दावायासी झाला पुनरपि नरदेही ।
पाहसिं प्रेमानें तू हिंदूयवनांही ।  दाविसी आत्मत्वाने व्यापक हां साई ।। ज0 ।। 3 ।।

देवा साईनाथ त्वत्पदनत व्हावें ।  परमायामोहित जनमोचन झणिं व्हावें ।
त्वत्कृपया सकलांचें संकट निरसावें ।  देशिल तरि दे त्वघश कृष्णानें गावें ।। ज0 ।। 4 ।।

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
आमच्या टेलिग्राम ग्रुप वर सभासद व्हा. इथे तुम्हाला इतर वाचक आणि लेखकांशी संवाद साधता येईल. telegram channel