जय देवी आद्यरूपे भुवनसुंदरी ।
पंचारति करितो तुज हे महेश्वरी ॥ धृ. ॥
निर्गुणाशि सगुणत्व तूंचि आणिले ।
अवघें हें विश्व तुझें रूप शोभले ॥
नपुंसक ना स्त्री न पुरुष तुचि मोहिले ।
मीतूंपणा हरुनि ज्ञानदीप दे करी ॥जय देवी. ॥ १ ॥
सर्व जगी व्यापुनियां खेळ खेळसी ।
ब्रह्मादिक सुर नर तुज ध्यातिं मानसी ॥
शुंभनिशूंभादि वधुनि देव रक्षिसी ।
नकळें तव पार कदा पापगिरी हरी ॥जय देवी ॥ २ ॥
हरिहर विधि करिति नवस जननि तुजप्रति ।
जे जे वर मागति ते देसि त्यांप्रती ॥
विठ्ठलसुत बलवत्कवि शरण तुज अती ।
मागतसे अभयवरा देई झडकरी ॥ जय. ॥ ३ ॥
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
आमच्या टेलिग्राम ग्रुप वर सभासद व्हा. इथे तुम्हाला इतर वाचक आणि लेखकांशी संवाद साधता येईल. telegram channel