हर अर्धांगी वससी । जासी यज्ञा माहेरासी ॥
तेथे अपमान पावसी । यज्ञकुंडी गुप्त होसी ॥ १ ॥
जय देवी हरिताळिके । सखि पार्वति अंबीके ॥
आरती ओवाळीत्यें । ज्ञानदीपकळीके ॥ धृ. ॥
रिघसी हिमाद्रीच्या पोटी । कन्या होसीं तूं गोमटी ॥
उग्रतपश्चर्या मोठी । आचरसी उठाउठी ॥ जय. ॥ २ ॥
तापपंचाग्रासाधनें । धूम्रपानें अधोवदने ॥
केली बहु उपोषणें । शंभुभ्रताराकरणे ॥ जय. ॥ ३ ॥
लीला दाखविसी दृष्टी । हे व्रत करिसी लोकींसाठीं ॥
पुन्हा वरिसी धूर्जटी । मज रक्षावें संकटी ॥ जय. ॥ ४ ॥
काय वर्णू तव गुण । अल्पमति नारायण ॥
मातें दाखवी चरण ॥ चुकवावे जन्ममरण ॥ जय देवी. ॥ ५ ॥
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
आमच्या टेलिग्राम ग्रुप वर सभासद व्हा. इथे तुम्हाला इतर वाचक आणि लेखकांशी संवाद साधता येईल. telegram channel