नसतां मारुत पावक जल अंबर भरणी ।
नसतां धाता सुरपति तारापति तरणी ॥
नसतां ग्रहगण भूतें होसी तूं तरणी ।
प्रलयसमुद्री सर्वहि जग तुझी करणी ॥ १ ॥
जय देवी जय देवी सकलागमसारे ।
नरावलंबे सर्वजगोद्वारे ॥
पांवे सत्वर वरदे चतुरे सुविचारें ।
अजरे अमरे सतदात्रि अविकारे ॥ धृ. ॥
जग निर्मुनि पाळिसी अंती तुजमाजी ।
अलक्ष्यलक्षवेना हे वैभव आजी ॥
वारी वारी जननें करुणाकर माझी ।
तेणें घडेल निरुती दयालुता साजी ॥ जय. ॥ २ ॥
प्रगटे विलंब न करि संतांचे सुमनी ।
जननी हे गुण तुज राज्यी त्रिभुवनी ॥
सुरवरपन्नग घ्यावी सत्वर तुज जननी ।
उदारदृष्टी दृधरिसी नरहरसंजिवनी ॥ जय. ॥ ३ ॥
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
आमच्या टेलिग्राम ग्रुप वर सभासद व्हा. इथे तुम्हाला इतर वाचक आणि लेखकांशी संवाद साधता येईल. telegram channel