जगतारिणी दु:खहारिणीं कुळस्वामिणी माते ।
नाना विघ्ने वेष्ठुनी कष्टविती माते ॥
करुणा करिं शांकरि तूं अनाथ जगनाथे ।
भवभय सर्वहि हरिसी हें तों तव नाते ॥ १ ॥
जय अंबे जगदंबे जय जय महाकाली ।
आरती ओंवाळूं पंचारति ओंवाळूं वंदू पद भाळी ॥ धृ. ॥
बौद्धरूप दैवत या कलिमाजी आले ।
न मिळे फल मनवांच्छित शंकित मन झालें ॥
तूं एक जागृत ऎकुनि माझें धाले ।
जडले दृढ मम मानस निश्चळ नाहालें ॥ जय. ॥ २ ॥
तव गुणप्रताप अद्‌भुत ऎकुनिया कानी ।
ध्यानी मनि दिनरजनि स्तवितो निर्वाणी ॥
लज्जा राखीं माते हे शुभकल्याणी ।
कृपाकटाक्षें लक्षीं रक्षी तव चरणी ॥ जय. ॥ ३ ॥
निर्जर मुनिवर सर्वहि तुजलागी ध्याती ।
केली त्यां कैवारें दैत्यावर ख्याती ॥
मर्दुनि शुंभनिशुंभा महिषासुरजाती ।
सप्तशतीचा महिमा मृकडुसुत गाती ॥ जय. ॥ ४ ॥
जिवजंतुमनकिंतू जाणसि सर्वांचा ।
अंतरसाक्षी हेतू कां न कळे अमुचा ॥
संचितक्रियमाणा जरि मानूं मुळसंचा ।
तरि मग काय परक्रम वदला मुनि त्याचा ॥ जय. ॥ ५ ॥
विज्ञप्ती श्रुत व्हावी सादर सुख शाली ।
बद्धांजुळि विनवीतों विनतीच्या चाली ॥
सुंदरपदपंकजींरखमा मिठी भाली ।
षट्‌पदवत गुंजारव करितो भोंताली ॥ जय. ॥ ६ ॥
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
आमच्या टेलिग्राम ग्रुप वर सभासद व्हा. इथे तुम्हाला इतर वाचक आणि लेखकांशी संवाद साधता येईल. telegram channel

Books related to देवी आरती संग्रह


बोध कथा
मराठी बोधकथा 1
कविता संग्रह
मराठी बोधकथा  2
भारत के सम्राट
भारत के जनप्रिय सम्राट
महाशिवरात्री
कल्पनारम्य कथा भाग १
स्वप्नफल- जंतूसंबंधीची
नेहमी पडणारी स्वप्न आणि त्यांचे अर्थ
महाराष्ट्राचे शिल्पकार
गरुड पुराण- सफल होण्याचे उपाय
नलदमयंती
भारत के राजवंश
प्रेम - प्रकरण की जीवन ?