स्वेच्छे ब्रह्म तुं स्फुरणि प्रगटसि मुळभाये ।
विधिहरिहर हीं बाळे निर्मुनि भुवनाये ॥
उत्पतिरक्षणप्रळयां निरवुनि सम पाये ।
प्रकृतिपुरुषात्मक तूं वर्तसि इह न्याये ॥ १ ॥
जय जय दुर्गे माते शचिच्छक्ते ।
पंचारति ओवाळूं तव पदिं कुळनाथ ॥ धृ. ॥
ब्रह्माभुवन निजवासी भक्तांस्तव त्यजुनी ।
निशुंभशुंभादिक हे दानव संहरुनी ॥
क्रीडसि सर्वाभ्यंतरि तुरिये उन्मनीं ।
अपार तव गुण किती हे वर्णूं लघुवदनीं ॥ जय. ॥ २ ॥
देवी शांतादुर्गा ऎशा अभिमानी ।
कैळोसीपुरी येथें प्रसन्न राहोनी ॥
निजद्विजभजकां स्मरणीं रक्षिसि धांवोनी ।
अनुचर मंगीशात्मज अनन्य तवचरणी ॥ जय. ॥ ३ ॥
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
आमच्या टेलिग्राम ग्रुप वर सभासद व्हा. इथे तुम्हाला इतर वाचक आणि लेखकांशी संवाद साधता येईल. telegram channel