ॐ नमो आद्यरूपें । देवी भगवती माते ॥
काळिका कामरूप । शक्ति तूं जगन्माते ॥
वैष्णवी भूतमाया। मूळपीठ देवते ॥
झालीया भेटी तुझी ।  नीवारसी पापातें ।। १ ॥
जय श्रीकुळदेवते । महालक्ष्मी ग माते ॥
आरती घेऊनिया । ओंवाळीन मी तूतें ॥ धृ. ॥
अंबिका भद्रकाली । देवी आद्या कुमारी ॥
मारिले चंडमुंड ।  महिषासुर हे वैरी ॥
हर्षले देवद्विज  । गाती जयजयकारी ॥
उजळुनी दीपमाळा ॥  ओंवाळीती नरनारी ॥ जय. ॥ २ ॥
परिधान हेमवर्ण । कंठी नवरत्नें हार  ॥ 
करतळे रातोत्फळे । अद्‌भूत जयजयकार ॥
अवतार कोल्हापुरी केला । प्रताप थोर ॥
मारिले दैत्य बिकट । अघट कोल्हापूरे ॥ जय. ॥ ३ ॥
नासिकी मुक्ताफळ । रत्नकुंडले श्रवणी ॥
घवघवीत नुपुरे हो अंदु वाजती चरणी मस्तकी पुष्पहार ॥
दिसे भासे वदनी । पौर्णिमाचंद्रबिंब ॥
पृष्ठीवरी रूळे वेणी ॥ जय. ॥ ४ ॥
नवकोटी कात्यायनी । चतु:षष्ठी योगीनी ॥
 भूचरां जळचरां । आई तुजपासुनी ॥
ऎसी तूं महालक्ष्मी । जगत्रयाची जननी  ॥ 
नामया विष्णुदासा । तुझे चिंतनध्यानी ॥ जय. ॥ ५  ॥
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
आमच्या टेलिग्राम ग्रुप वर सभासद व्हा. इथे तुम्हाला इतर वाचक आणि लेखकांशी संवाद साधता येईल. telegram channel