त्रिपिटक

त्रिपिटक हा बौद्ध धर्मीयांचा प्रमुख व महत्त्वाचा धर्मग्रंथ आहे. इ.स.पू. १०० ते इ.स.पू. ५०० या दरम्यान, मौर्य राजवंशाच्या कार्यकाळात या ग्रंथांची निर्मिती झाली. त्रिपिटक हा ग्रंथ पाली भाषेत लिहिला गेलेला एक ग्रंथसमूह असून तो तीन पेट्यांत किंवा हिश्श्यांत विभागला गेला आहे. त्रिपिटकाचे तीन विभाग — विनयपिटक, सुत्तपिटक व अभिधम्मपिटक. या तीन पिटकांमुळे या ग्रंथाला 'त्रिपिटक' हे नाव पडले.

धर्मानंद कोसंबीआचार्य धर्मानंद दामोदर कोसंबी (ऑक्टोबर ९, १८७६ - जून २४, १९४७; सेवाग्राम, ब्रिटिश भारत) हे एक बौद्ध धर्माचे व पाली भाषेचे अभ्यासक व मराठी लेखक होते. यांनी श्रीलंकेत जाऊन तेथील विद्योदय विद्यापीठात बौद्ध धर्माचा व तत्त्वज्ञानाचा अभ्यास केला. तसेच म्यानमारात (ब्रम्हदेशात) जाऊन त्‍यांनी बर्मी भाषेतील बौद्ध साहित्याचा तौलनिक अभ्यास केला. मराठी गणितज्ञ व इतिहासकार दामोदर धर्मानंद कोसंबी हे त्‍यांचे पुत्र, आणि डॉ. मीरा कोसंबी या त्यांच्या नात होत.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel