भंते प्रज्ञानंद (जन्म: कॅण्डी-श्रीलंका, १८ डिसेंबर, १९२७; मृत्यू: लखनौ, ३० नोव्हेंबर २०१७) हे भारतीय बौद्ध भिक्खू होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना १४ ऑक्टोबर १९५६ रोजी धम्मदीक्षा देणाऱ्या पाच भंतेच्या पथकात भंते प्रज्ञानंद होते. ते डॉ. आंबेडकरांना पहिल्यांदा रंगून, म्यानमार येथे झालेल्या धम्मसंगिनी परिषदेत भेटले.

सुरुवातीचे जीवन व कारकीर्द

प्रज्ञानंदांचा जन्म १८ डिसेंबर १९२७ रोजी श्रीलंकेतील कॅण्डी येथे झाला, येथेच त्यांनी प्राथमिक शिक्षण घेतले. शिकत असतानाच त्यांना धर्मप्रसार करण्याचे महत्त्व कळू लागले. अनागरिक धम्मपाल यांनी प्रज्ञानंदांना श्रीलंकेतून भारतात आणले. भारतात त्यांची ओळख भिक्खू बोधानंद यांच्याशी झाली, जे उत्तर प्रदेशातील रिसालदार बुद्ध विहाराचे प्रमुख होते. त्यांनी भारतात 'त्रिपिटीकाचार्य' पदवी मिळवली. इ.स. १९४२ मध्ये धम्मदीक्षेनंतर 'प्रज्ञानंद' धारण केले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर व प्रज्ञानंद यांची येवला येथील भेटीत नागपूर धम्मदीक्षा सोहळ्याचे स्वरूप ठरले. ते महास्थवीर चंद्रमणी यांच्या संघात सहभागी झाले. बोधानंद यांचे निधन झाले तेव्हा प्रज्ञानंद केवळ २५ वर्षांचे होते. तरुण वयातच त्यांच्याकडे उत्तर प्रदेशातील रिसालदार बुद्ध विहाराचे प्रमुखपद आले. आंबेडकरांनी दीक्षा घेतल्यानंतर देशातील अनेक भागांत लोक दीक्षेसाठी इच्छुक होते. देशभरातील असंख्य लोकांकडून धम्मदीक्षेसाठी मागणी येऊ लागली. त्यासाठी प्रज्ञानंद अनेक ठिकाणी गेले. उत्तर प्रदेशातील अलीगडला त्यांनी अडीच लाख लोकांना बौद्ध धम्माची दीक्षा दिली. दीक्षा देण्यासाठी पुरेसे प्रशिक्षित भिक्खू नसल्याने प्रज्ञानंदांनी भिक्खूंच्या प्रशिक्षणासाठी उत्तर प्रदेशातील श्रावस्तीला रेन चेन भिक्खू प्रशिक्षण केंद्र स्थापन केले. आज जगभरात या केंद्राचे नाव आदराने घेतले जाते.

कार्य

    श्रीवस्ती येथे जेतवन इंटर कॉलेजची स्थापना
    अध्यक्ष शिक्षण परिषद
    अध्यक्ष श्रावस्तीचे जेतवन महाविद्यालय
    अध्यक्ष भारतीय बौद्ध परिषद
    अध्यक्ष महाबोधी विद्यापरिषद
    मानव उत्थान मिशन अभियान चालवले.
    'वज्रसूची' ग्रंथाचे पाली भाषेतून हिंदीत भाषांतर केले.

निधन
उत्तर प्रदेशातील लखनौ ३० नोव्हेंबर २०१७ रोजी प्रज्ञानंदांचे निर्वाण झाले.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel