धर्माचारी सुभुती, मुळचे अलेक्स केनेडी, हे संघरक्षिता यांचे सहाय्यक आहेत, त्यांनी त्रीरत्न बुध्दीस्ट समाजाची स्थापना केली (आधीची फ़्रेंड्स ओफ़ द वेस्टर्न बुध्दीस्ट ओर्डर), शिवाय हे लंडन बुध्दीस्ट केंद्राचे संचालकही आहेत.यांनी अनेक महत्वाच्या जागा भुषवल्या आहेत आणि समाजाच्या उन्नतीसाठी मदत केली आहे.
लंडन बुध्दीस्ट केंद्राची उभारणी करण्य़ात यांनी महत्वाचे कार्य केले, या केंद्राची स्थापना १९७८ साली झाली, हे केंद्र उभे करण्यासाठी धर्माचारी यांनी ग्रेट लंडन कौन्सीलकडून वित्तसहाय्य मिळविण्यात मोठा हातभार लावला. त्यांनी नोर्वीक इंग्लंड येथील त्रिरत्न बुध्दीस्ट ओर्डर च्या पद्मलोक रिट्रीट केंद्रामध्ये पुरुषांसाठी प्रशिक्षणाची व्यवस्था सुरु केली. त्यांनी स्पेन येथील गुह्यलोक केंद्राच्या स्थापने मध्ये मदत केली, ह्या केंद्रामध्ये पुरुष संप्रदायाचा भाग होण्याचे अंंतिम प्रशिक्षण पुर्ण करतात.