अंगुलिमाल बुद्ध काळातील एक डाकू होता जो नंतर गौतम बुद्धांपासून प्रभावित होऊन बौद्ध भिक्खू बनला. अंगुलिमाल हा राजा प्रसेनजितच्या राज्यातील श्रावस्तीच्या जंगलातल्या प्रवाशांना मारून टाकत असे आणि त्यांच्या बोटांची माळ बनवून गळ्यात घालत असे. यामुळे त्याचे नाव 'अंगुलिमाल' पडले होते. जेव्हा गौतम बुद्ध श्रावस्तीत आले व ते अंगुलिमालास भेटले तेव्हा अंगुलिमालाने हत्या करण सोडून दिले व तो बुद्धाचा शिष्य बनला.

चित्रपट

    सन १९६०मध्ये अंगुलिमालच्या जीवनावर 'अंगुलिमाल' नावाचा हिंदी चित्रपट बनवण्यात आला होता. या चित्रपटात भारत भूषण याने अंगुलिमालची भूमिका केली होतो. चित्रपटाचे दिग्दर्शन विजय भट्ट यांचे होते. संगीत अनिल विश्वास यांचे असून चित्रपटात लता मंगेशकर, आशा भोंसले, मीना कपूर, आरती मुखर्जी आणि मन्ना डे यांनी गायलेली काही सुमधुर गाणी होती.
    २००३ मध्ये थायलंडमध्ये थाई भाषेत अंगुलिमालवर 'अंगुलिमाल' नावाचा चित्रपट बनवण्यात आला होता.
    २०१३ मध्ये भारतामध्ये कन्नड भाषेत अंगुलिमालवर 'अंगुलिमाल' नावाचा चित्रपट बनवण्यात आला होता.

नाटक

    'अंगुलिमाल' नावाचे एक हिंदी नाटकही होते. कुमार रवींद्र यांनी लिहिलेल्या त्या नाटकाचे दिग्दर्शन अशोक जांबुलकर करीत.

    'अंगुलिमाल' नावाचे आणखी एक हिंदी महानाट्य आहे; प्रेमकुमार उके हे त्याचे निर्माते, लेखक, गीतकार, साहाय्यक दिग्दर्शक आहेत. मृणाल यादव मुख्य दिग्दर्शक. या महानाट्यात ५० कलावंत होते. .

    अंगुलिमाल नावाचे अमर चित्र कथा पुस्तक (काॅमिक) आहे.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel