बोधिसत्व (बोधिसत्त्व) म्हणजे जगाच्या शांतीकरीता वा आनंदाकरीता कार्य करणारे व्यक्ती होय. ही बौद्ध धर्मातील एक संकल्पना आहे. 'बोधिसत्त्व' ह्या शब्दाचा मूळ अर्थ "ज्याला पुढे केव्हा तरी 'बोधी' म्हणजे ज्ञान प्राप्त होणार आहे असा" असाही होतो.
धर्मानंद कोसंबीआचार्य धर्मानंद दामोदर कोसंबी (ऑक्टोबर ९, १८७६ - जून २४, १९४७; सेवाग्राम, ब्रिटिश भारत) हे एक बौद्ध धर्माचे व पाली भाषेचे अभ्यासक व मराठी लेखक होते. यांनी श्रीलंकेत जाऊन तेथील विद्योदय विद्यापीठात बौद्ध धर्माचा व तत्त्वज्ञानाचा अभ्यास केला. तसेच म्यानमारात (ब्रम्हदेशात) जाऊन त्यांनी बर्मी भाषेतील बौद्ध साहित्याचा तौलनिक अभ्यास केला. मराठी गणितज्ञ व इतिहासकार दामोदर धर्मानंद कोसंबी हे त्यांचे पुत्र, आणि डॉ. मीरा कोसंबी या त्यांच्या नात होत.