सोपानम्हणेदेवोत्तमा ॥ पूर्वीयेथेहोताब्रह्मा ॥ आणितुम्हीसर्वोत्तमा ॥ कोणेस्थळीहोतादेवा ॥१॥

देवम्हणेकथापरिस ॥ कोट्यानुकोटीयुगास ॥ आम्हीहोतोपंढरीस ॥ अनंतकल्पेंगेली ॥२॥

अनंतभक्तांचियामेळी ॥ अनंतवैष्णवभूमंडळी ॥ माजीगवसलेसकळी ॥ केलीआगळीपुंडलीके ॥३॥

येणेप्रसन्नकेलेशंकरा ॥ शंकरेदाखविलेनिर्धारा ॥ आपणराहूनपाठमोरा ॥ जगदुद्धाराकीर्तनी ॥४॥

भक्तिचेनिआराधन ॥ साधियेलेबहुपुण्य ॥ माझेझालेसेयेणे ॥ एककारणपुंडलिकाचे ॥५॥

पूर्वापंढरीसी ॥ होतीविष्णुमात ऐसी ॥ निर्धारकरोनीमानसी ॥ अहर्निशीअनुष्ठान ॥६॥

येथूनपूर्वभागीपंढरी ॥ पश्चिमभागीब्रह्माअवधारी ॥ झालाअवतारकरेपाठारी ॥ महादेवशिखरीमानदेती ॥७॥

तेतीसकोटीदेवस्थळी ॥ पूर्वपश्चिमवश्यमंडळी ॥ उग्रतपसाधिलेचंद्रमौळी ॥ याइंद्रनीळपर्वतावरी ॥८॥

द्रोणाचळ इंद्राचळ ॥ हनुमंतेआणिलाविशाळ ॥ त्याच्याशाखाअधोमूळ ॥ तोहाइंद्रनीळपर्वत ॥९॥

येथेवल्लीसुवर्णाकार ॥ गुप्त अतीनिर्धार ॥ दिसे अस्तमानीअंधार ॥ दीप अकराजगाप्रती ॥१०॥

येथूनियादक्षिणद्वार ॥ गोकर्णमहाबळेश्वरपाठार ॥ पाताळद्वारीपूजाशंकर ॥ बेलपत्रेअद्यापिनिघती ॥११॥

नामाम्हणेदेवाधिदेव ॥ सांगीतलास्वानुभव ॥ अधिष्ठानगुढाव ॥ सोपानदेवनिवांत ॥१२॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
आमच्या टेलिग्राम ग्रुप वर सभासद व्हा. इथे तुम्हाला इतर वाचक आणि लेखकांशी संवाद साधता येईल. telegram channel