मगसारूनसंध्यास्नान ॥ देवभक्तविष्णुपूजन ॥ पंक्तिआदरिलेआपोषण ॥ मागुतीभोजनकरिताती ॥१॥

धन्यधन्यतूज्ञानराजा ॥ आवडतुझीकेशवराजा ॥ पंक्तिपरवडीसमाजा ॥ वाढितीवोजारुक्मिणी ॥२॥

उभीराहीसत्यभामा ॥ वाढितीपंचामृत उत्तमा ॥ बैसूनपुंडलीकसामा ॥ म्हणतीदुर्लभा ॥३॥

निवृत्तिसोपानमुक्ताबाई ॥ गोपाळदेव्हडेदोहीबाही ॥ रुक्मिणीसत्यभामाराही ॥ चतुष्टयठायीवाढिती ॥४॥

वैष्णवप्रेमळांचेपंक्ती ॥ प्रार्थनाकरीतसेश्रीपती ॥ सोपानज्ञानदेवनिवृत्ती ॥ एकचीवृत्तीबैसले ॥५॥

गरुडहनुमंततिष्ठतद्वारी ॥ त्यासीरुक्मिणीताटकरी ॥ आनंदेगर्जतीजयजयकारी ॥ रामकृष्णहरीगोविंद ॥६॥

देवगणगंधर्वपाहाती ॥ ब्रह्मादिकचलाम्हणती ॥ केवढेभाग्याचियामूर्ती ॥ भक्त आवडतीजिवलग ॥७॥

नामाम्हणेअलंकापुर ॥ क्षेत्रसर्वामाजीथोर ॥ ज्ञानदेवसमाधीस्थीर ॥ नामगर्जतसर्वकाळ ॥८॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
आमच्या टेलिग्राम ग्रुप वर सभासद व्हा. इथे तुम्हाला इतर वाचक आणि लेखकांशी संवाद साधता येईल. telegram channel