दशरथ राजकुमारा धृत मुक्ताहारा ॥
शरयूतीर विहारा शमित क्षितिभारा ॥
करुणा पारावारा कपिगण परिवारा ॥
निर्गत निखिल विकारा निगमागम सारा ॥ १ ॥
जय देव जयदेव जय सीतारामा ॥
सजल बलाहक श्यामा सच्चित्सुखधामा ॥ धृ. ॥
रविकुल राजललामा रम्यगुण ग्रामा ॥
रुप विनिर्जित कामा रुद्रस्तुत नामा ॥
परिपालित सुत्रामा पूर्णस कलकामा ॥
विश्वविलास विरामा ॥
विठ्ठल विश्रामा ॥
जय देव जय देव जय सीतारामा ॥ २ ॥
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
आमच्या टेलिग्राम ग्रुप वर सभासद व्हा. इथे तुम्हाला इतर वाचक आणि लेखकांशी संवाद साधता येईल. telegram channel