श्यामसुंदर रामाचे चरणकमळी ॥
ओंवाळूं आरती कनकपरियळी ॥ धृ. ॥
वाळा मुग्धा यौवन प्रौढा सुंदरी ॥
आरत्या घेऊनी आलिया नारी ॥ श्याम. ॥ १ ॥
चौघे म्हणती निजगतीं चला मंदिरा ॥
नव त्याही इच्छिती सेवा सुंदरा ॥
श्याम. ॥ २ ॥
दास म्हणे सुमनशेजे चला श्रीहरी ॥
क्षण एक विश्रांति करा अंतरी ॥ ३ ॥
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
आमच्या टेलिग्राम ग्रुप वर सभासद व्हा. इथे तुम्हाला इतर वाचक आणि लेखकांशी संवाद साधता येईल. telegram channel