जयदेव जयदेव जयजय श्रीरामा । आरती ओवाळूं तुज मेघश्यामा ॥धृ॥
लीला दाउनि अगणित आले पंचवटीं । वसते झाले येउनि गंगातिरनिकटीं । सीता लक्षूमण रघुविर धोर्जटी । चवदा वर्षें केल्या तपाच्या कोटी । १ जयदेव ॥
दंडुनिया रजनीचर कांता सोडविली । तेहतिसकोटि देवाची सुटका केली ॥ जयदेव ॥२॥
आडवि जाउनि अवघी ऋषीमंडळी । श्रीरामासि अणिलें गोदातिर जवळी । वामांकावरि सीता शोभे ते काळीं । नीरंजन आरति घेउनि ओवाळी ॥३॥ जयदेव ॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
आमच्या टेलिग्राम ग्रुप वर सभासद व्हा. इथे तुम्हाला इतर वाचक आणि लेखकांशी संवाद साधता येईल. telegram channel