जय देव जय देवी जय भगवद्‌गीते ।

आरती ओवाळूं तुज वेदमाते ॥ धृ. ॥

सुखकरणी दु:खहरणीं जननी वेदांची ।

अगाध महिमा तुझा नेणें वीरिंची ॥

ते तूं ब्रह्मी तल्लिन होसी ठायींची ।

अर्जुनाचे भावें प्रगटे मुखींची ॥ १ ॥

सातशतें श्लोक व्यासोक्ती सार ।

अष्टादशाध्य इतुका विस्तार ॥

एक अर्ध पाद करितो उच्चार ।

स्मरणमात्रें त्यांच्या निरसे संसार ॥ जय. ॥ २ ॥

तुझा पार किती वर्णू मी दीन ।

अनन्यभावे तुज आलो मी शरण ॥

सनाथ करी माये कृपा करून ।

बाप रखुमादेवी वरदासमान ॥

जय देवी. ॥ ३ ॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
आमच्या टेलिग्राम ग्रुप वर सभासद व्हा. इथे तुम्हाला इतर वाचक आणि लेखकांशी संवाद साधता येईल. telegram channel

Books related to इतर आरती संग्रह