जयजयाची ज्ञानदेवा आदि देवाचिये देवा ।
संपूर्ण ज्ञानियांचा तूचि एक पूर्ण ठेवा ॥धृ॥
ब्रह्मादिक जगताचा कर्ता धरता संहरता ।
नित्यमुक्त ज्ञानरूप मायादेवीचा भर्ता ।
करोनि सर्व कांहीं स्वयें असे आकर्ता ।
ऐसि या ईश्वराची नसे तुझे ठायीं वार्ता ॥१॥
ईशजिव नानाभेदें जीच्या योगें भासला ।
अष्टधा भेदयुक्त प्रकृतीच्या परि जाला ।
जगत्पटीं ओतप्रोत अंतर्बाह्य संचला ।
ऐसाहि आदिपुरुष तुझे ठायीं नाहीं जाला ॥२॥
अधिष्ठानविवर्तत्वें वेद करिती वर्णन ।
चिच्छक्तीच्या योगें खेळे आपले ठायीं आपण ।
ऐसा जो कां परमात्मा तोही होतां स्वरूपीं लीन ।
चिच्छक्ति हे मावळलि तेथें कैचें ज्ञानाज्ञान ॥३॥
जरि कांहिं स्तुति करुं तरि येतें वाच्यपण ।
श्रुति जेथें मौनावल्या इतराचा पाड कोण ।
निरंजनरघुनाथ सांडी ओवाळोनी मन ।
मीपण हरारपलें जालें परेलागीं मौन ॥४॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
आमच्या टेलिग्राम ग्रुप वर सभासद व्हा. इथे तुम्हाला इतर वाचक आणि लेखकांशी संवाद साधता येईल. telegram channel