दत्त दिगंबर त्रिमूर्ति सुंदर अनुसूयासुत तुज म्हणती ।

आरती ओवाळिता तरले असंख्य जन हे मूढमति ॥ धृ. ॥

जग ताराया हरि हर ब्रह्मा त्रिमूर्तिरूपे अवतरती ।

दंडकमंडलु हस्ती धरुनी काषायांबर पांघरती ॥ १ ॥

कुष्ठी ब्राह्मण शुद्ध करूनी वंध्ये पुत्र देताती ॥

मृत ब्राह्मणही उठविसि तीर्थे काष्ठीं पल्लव फुटताती ॥ २ ॥

दत्त दत्त हे नाम स्मरतां पिशाच्च भूतें झणिं पळती ।

गाणगाभुवनी गुप्त राहुनियां अघटित लीला दाखविती ॥ ३ ॥

महिमा काय वर्णू किती मी भक्तवत्सला तुला म्हणती ।

मोरेश्वरसुत वासुदेव या अखंड भजना देई प्रीति ॥ ४ ॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
आमच्या टेलिग्राम ग्रुप वर सभासद व्हा. इथे तुम्हाला इतर वाचक आणि लेखकांशी संवाद साधता येईल. telegram channel