जय देव जय देव जय अवधूता ।

अगम्यें लीला स्वामी त्रिभुवनि तुझि सत्ता ॥ धृ. ॥

तुझें दर्शन होतां जाती हीं पापें ।

स्पर्शनमात्रें विलया जाती भवदुरितें ॥

चरणी मस्तक ठेवुनि मनिं समजा पुरतें ।

वैकुंठीचे सुख नाही यापरतें ॥ जय. ॥ १ ॥

सुगंधकेशर भाळीं वर टोपीटीळा कर्णि कुंडलें शोभति वक्ष:स्थळि माळ ।

शरणांगत तुज होतां भय पडलें काळा ।

तुझे दास करिती सेवासोहळा ॥ २ ॥

मानवरुपी काया दिससी आम्हांस ।

अक्कलकोटी केंला यतिवेषे वास ॥

पूर्णब्रह्म तोची अवतरला खास ।

अज्ञानी जीवांस विपरीत हा भास ॥ जय. ॥ ३ ॥

निर्गुण निर्विकार विश्वव्यापक ।

स्थिरचर व्यापुनि अवघा उरलासी एक ॥

अनंत रुपें धरिसी करणें मायीक ।

तुझें गुण वर्णिता थकले विधिलेख ॥ ४ ॥

घडता अनंतजन्यसुकृत हें गांठी त्याची ही फलप्राप्ती सद्‌गुरुची भेटी ।

सुवर्णताटी भरलीं अमृतरसवाटी ॥

शरणागत दासावरि करी कृपादृष्टी ॥ ५ ॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
आमच्या टेलिग्राम ग्रुप वर सभासद व्हा. इथे तुम्हाला इतर वाचक आणि लेखकांशी संवाद साधता येईल. telegram channel