आतां स्वामी सुखे निद्रा करा अवधूता, करा अवधूता ।

चिन्मय सुखधामा जाउनि पहुडा एकांता ॥ धृ. ॥

वैराग्याचा कुंचा घेउनि चौक झाडीला, स्वामी चौक झाडीला ॥

तयावरी सुप्रेमाचा शिडकावा दिधला ॥ आतां. ॥ १ ॥

पायघड्या घातल्या सुंदर नवविधाभक्ती, स्वामी नवविधाभक्ती ।

ज्ञानाच्या समया उजळूनी लावियल्या ज्योती ॥ आतां ॥ २ ॥

आशातृष्णा कल्पनांचा सांडुनि गलबला, स्वामी सांडुनि गलबला ।

दया क्षमा शांती दासी उभ्या सेवेला ॥ आतां. ॥ ३॥

दैत्याचें कपाट लाउनी एकत्र केलें, स्वामी एकत्र केलें ।

दुर्बुद्धीच्या गांठी सोडुनि पडदे सोडीले ॥ आतां. ॥ ४ ॥

भावार्थाचा मंचक ह्रुदयाकाशीं टांगीला, ह्रुदयाकाशी टांगीला ।

मनाची सुमनें जोडुनी केलें शेजेला ॥ आतां. ॥ ५ ॥

अलक्ष्य उन्मनि नाजूक दूशेला, स्वामी नाजुक दूशेला ।

निरंजनी सद्‌गुरू माझा निजी निजेला ॥ आतां. ॥ ६ ॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
आमच्या टेलिग्राम ग्रुप वर सभासद व्हा. इथे तुम्हाला इतर वाचक आणि लेखकांशी संवाद साधता येईल. telegram channel