अनसूयानंदना तुज ओवाळूं आरती । अनसूयानंदना मज निज चरणीं दे रति ॥धृ.॥
सर्वात्मा तूं असोनी निजशी बा माहुरी । करिशीं तूं स्नान नित्य प्रेमें काशीपुरीं । निजदासा भेट द्याया भिक्षा कोल्हापुरीं । वससी या विश्वासा सह्याद्रीगिरीवरी । अनसूयानंदना ॥१॥
निज भजकां भेट देसी निजनामोच्चरणें । कलिमाजीं बाहती तुज दत्ता या कारणें । जाणुनि हें तुजपाशीं केलें म्यां गार्‍हाणें । निजचरणा दावि त्याहुनि नच दुसरें मागणें । अनसूयानंदना ॥२॥
पतिरूपा घेऊन तूं वससी कृष्णातटीं । निजदासा उद्धराया जागृत तूं संकटीं । प्रत्यक्ष गाणगापुरीं दिससी दासा मठीं । समजुनि हें वासुदेव तुज जोडी करपुरी । अनसूयानंदना तुज ओवाळूं आरती । अनसूयानंदना मज निज चरणीं दे रति ॥३॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
आमच्या टेलिग्राम ग्रुप वर सभासद व्हा. इथे तुम्हाला इतर वाचक आणि लेखकांशी संवाद साधता येईल. telegram channel