श्रीगुरु दत्तराजमूर्ति । ओवाळितों प्रेमें आरती ॥धृ.॥
उद्धार जगाचा । जाहला बाल अत्रिऋषिचा । धरिला वेष असे यतिचा । मस्तकीं मुकुट शोभे जटिचा । कंठिं रुद्राक्षमाळ स्मरणीं । हातांमध्यें आयुधें बहुत वणीं । तेणें भक्तांचे क्लेश हरणी । त्यासी करूनि नमन, अधशमन, होईल रिपुदमन, गमन असे त्रैलोक्यावरती । ओवाळितों प्रेमें आरती ॥१॥
गाणगापुरीं वस्ति ज्याची । प्रीति औदुंबरछायेची । भीमाऽमरजासंगमाची । भक्ति असे बहुत सुशिष्यांची । वाट दाउनियां योगाची । ठेव देतसें निजमुक्तीची । काशीक्षेत्रीं स्नान करितो । करवीरीं भिक्षेला जातों । माहुरिं निद्रेला वरतों, जरतारतरित, छाटि झरझरित, नेत्र गरगरित, शोभी । त्रिशुल जपा हातीं । ओवाळितों प्रेमें आरती ॥२॥
अवधूतालागीं सुखानंदा । ओवाळितों सौख्यकंदा । तारि हा दास रदनकंदा । सोडवी विषयमोहछंदा । आलों शरण अत्रिनंदा । दाविंसद्‌गुरु ब्रह्मानंदा चुकवी चौर्‍याशीचा फेरा । घालिती षड्रिपु मज घेरा । गांजिति पुत्रपौत्रदारा । वदनीं भजन, मुखीं पुजन, करितसें, तयांचे बलवंता । ओवाळितों प्रेमे आरती । श्रीगुरु दत्तराजमूर्ति । ओवाळितों प्रेमें अरती ॥३॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
आमच्या टेलिग्राम ग्रुप वर सभासद व्हा. इथे तुम्हाला इतर वाचक आणि लेखकांशी संवाद साधता येईल. telegram channel