आरती ओवाळूं अनसूया । तनय दत्तात्रेया ॥धृ.॥
सर्वांतरिंचे जें निजगुजसाक्षि भूतचि तेज । संसार वृक्षांचे आदि बीज । तो हा सद्‌गुरुराज । विरज ब्रह्मजया म्हणती तया ॥ श्रीगुरु दत्तात्रेया ॥१॥
सात्त्विक ह्रदय हे आरती । निज कर्माच्या वाती । विवेक स्नेहानें त्या निगुती । भिजवुनि ज्ञानज्योति पाजळुनि पेटविल्या । ओवाळल्या श्रीगुरु दत्तात्रेया ॥२॥
आरती उजळीता ह्या चित्ता । मध्यें तिळभर ध्वांता । वावहि नच मिळतां दृश्यता । आलि निमेषण जातां । सोहं प्रकाश हा हो सखया । श्रीगुरु दत्तात्रेया ॥३॥
प्रकाश आरतीचा हा थोर । सबाह्य अभ्यंतर । मी-तूं-पण हाचि अंधकार । जाळुनि झळके फार । वेगळा वासुदेव तेथुनियां । नोहे दत्तात्रेया ॥४॥ आरती ओवाळूं०॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
आमच्या टेलिग्राम ग्रुप वर सभासद व्हा. इथे तुम्हाला इतर वाचक आणि लेखकांशी संवाद साधता येईल. telegram channel