मंगलारती करूं श्रीगुरुदत्ता ॥ माझ्या बालावधूता ॥ अहंभावटाकुनी चरणीं ठेवियला माथा ॥धृ.॥
महिमा अनंत सद्‌गुरूचा वर्णूं मी किती ॥ दर्शनमात्रें नाहीं होय संसारभीती ॥१॥
काषायांबर दंड कमंडलु प्रसन्न वदन ॥ कामधेनु कल्पवृक्ष सुंदर हें ध्यान ॥२॥
तिन्ही लोकीं फेरी जयाची भक्तांच्या काजा ॥ स्मरणमात्रें प्रगटे सर्वांठायीं गुरुराजा ॥३॥
भक्तिभावें गाती तेथें सद्‌गुरु उभा ॥ भाविकासी निजसुखदाता कैवल्यगाभा ॥४॥
ग्रंथिभेद संशयछेद कर्मक्षय जाहला ॥ परात्पर परिपूर्ण दत्त ह्रदयीं भरला ॥५॥(पंतमहाराज)

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
आमच्या टेलिग्राम ग्रुप वर सभासद व्हा. इथे तुम्हाला इतर वाचक आणि लेखकांशी संवाद साधता येईल. telegram channel