जयदेव जयदेव अत्री ऋषिवर्या ओवाळूं आरती महापुरुषाचार्या ॥धृ.॥
जय जय नाथ सनातन अक्षर ॐ कारा । अनुहत अहं सोहं ध्वनि अहंकारा । त्रिगुणातीता आणिसी त्रैगुणाकारा । अनंत गुणगणकांसी न येसि गुणाकारा ॥१॥
श्रीमुनि ब्रह्मपरायण, दिव्यतपोरासी । पढविसि सद्विद्या विधि-हरि-हर-पोरांसी । त्रैमूर्तीच्या दारा येउनि दारासी । प्रार्थिति प्रतिप्राप्तिस्तव स्वामि उदारासी ॥२॥
झाला चंद्र विधाता शोभत आकाशीं ॥ आक्रमि शिव दुर्वास सप्तहि लोकांसी । श्रीपति दत्तरूपें गृहिं तोषवि जनकासी । यास्तव म्हणती माहूर जवागळें काशी ॥३॥
श्रीसिंहाद्रापर्वतिं दत्तात्रय अत्री । सह अनसूया पूजिति द्विज वेदमंत्री । वर्षति घन पुष्पांजली, वाजति वाजंत्री । विष्णुदास महोत्सव अवलोकित नेत्रीं ॥४॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
आमच्या टेलिग्राम ग्रुप वर सभासद व्हा. इथे तुम्हाला इतर वाचक आणि लेखकांशी संवाद साधता येईल. telegram channel