करितों प्रेमें तुज नीरांजन स्थिरवुनियां मन । दत्तात्रेया सद्‌गुरुवर्या भावार्थेकरून ॥धृ.॥
धरणीवर नर पीडित झाले भवरोगें सर्व ॥ काम क्रोधादिक रिपुवर्गे व्यापुनि सगर्व । योग याग तप दान नेणति असतांहि अपूर्व । सुलभपणें निजभजनें त्यासी जो शर्व ॥१॥
अत्रिमुनीच्या सदनीं तीनी देव भुके येति । भिक्षुक होउनि अनसूयेप्रति बोलती त्रयमूर्ती । नग्न होउनि आम्हांप्रति द्या अन्न असें म्हणती । परिसुनि होउनि नग्न अन्न दे तव ते शिशु होती ॥२॥
दुर्वासाभिध मौनी जहाला शंभू प्रमथेंद्र ब्रह्मदेव तो चंद्र जहाला तो उपेंद्र । दत्तात्रेय जो वीतनिद्र तो तारक योगींद्र । वासुदेव यच्चरण चिंतुनी हो नित्य अतींद्र ॥३॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
आमच्या टेलिग्राम ग्रुप वर सभासद व्हा. इथे तुम्हाला इतर वाचक आणि लेखकांशी संवाद साधता येईल. telegram channel