जयदेव जयदेव जय श्रीस्वामिसमर्था ॥ आरती ओवाळूं चरणीं ठेवूनियां माथा ॥धृ.॥
छेली खेडे ग्रामीं तूं अवतरलासी ॥ जगदोद्धारासाठीं राया तूं फिरसी ॥ भक्तवत्सल खरा तूं एक होसी ॥ म्हणूनि शरण आलों तुझे चरणांसी ॥१॥
त्रैगुण परब्रह्म तुझा अवतार ॥ त्याची काय वर्णू लीला पामर ॥ शेषादिक शिणले नलगे त्यां पार ॥ तेथें जडमूढ कैसा करूं मी विस्तार ॥२॥
देवाधिदेव तूं स्वामिराया ॥ निर्जरमुनिजन ध्याती भावें तव पायां ॥ तुजसी अर्पण केली आपुली ही काया ॥ शरणागता तारी स्वामिराया ॥३॥
अघटित लीला करूनी जढमूढ उद्धरिले ॥ कीर्ति ऐकुनि कानीं चरणीं मी लोळें ॥ चरणप्रसाद मोठा मज हें अनुभवलें ॥ तुझ्या सुतां नलगे चरणावेगळें ॥जयदेव जय.॥५॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
आमच्या टेलिग्राम ग्रुप वर सभासद व्हा. इथे तुम्हाला इतर वाचक आणि लेखकांशी संवाद साधता येईल. telegram channel