मंजुषा सोनार

शेंगदाणे-मिरचीचा तव्यावरचा चवदार ठेचा!

जिन्नस:
सात-आठ मिरच्या, मूठभर शेंगदाणे, लसणाच्या चार-पाच पाकळ्या, जिरं, दोन चमचे तेल, कोथिंबीर, मीठ

मार्गदर्शन:
•    प्रथम मिरच्या स्वच्छ धुवून बारीक चिराव्यात.
•    लसूण पाकळ्या चिराव्यात.
•    तव्यावर तेल टाकून, प्रथम शेंगदाणे टाकावेत. नंतर, मिरच्या, लसूण टाकावेत.
•    ते भाजले गेल्यावर, ते मिश्रण बाजूला सारून, तव्याच्या मध्यभागी तेल टाकावे. त्यात जिरं व बारीक चिरलेली कोथिंबीर टाकावी.
•    मग ते सगळे मिश्रण एकत्र करावे. जिरं शेवटी टकल्याने ते जळत नाही.
•    मग मीठ टाकून त्याला जाडे भरडे ठेचावे.
•    हवं असल्यास त्यावर लिंबू पिळू शकतो.
•    तोंडी लावायला अगदी चवदार !!
 
टीप: मिक्सर वापरू नये. ठेचलेलाच छान लागतो.
माहितीचा स्रोत: मी स्वत:

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
आमच्या टेलिग्राम ग्रुप वर सभासद व्हा. इथे तुम्हाला इतर वाचक आणि लेखकांशी संवाद साधता येईल. telegram channel