“दुर्गामाता दौड” या शब्दातच या शब्दाची ताकत आणि सारा अर्थ सामावलेला आहे. पृथ्वीतलावर जेंव्हा जेंव्हा संकट येते, जेंव्हा जेंव्हा म्लेंच्छाची गर्दी होते तेंव्हा तेंव्हा आई जगदंबा दुर्गेचा अवतार घेते. याच दुर्गेच्या नावाने गुरुवर्य संभाजी राव भिडे गुरुजींनी सुरु केलेली हि दौड म्हणजे हिंदूधर्म रक्षितेच प्रतिक, शिवरायाच्या अपार पराक्रमाची गाथा, आणि झोपलेल्या हिंदूला खडबडून जागे करण्याची धमक या दौडमध्ये दिसली.

अशीच एक दौड काल दादर येथे निघालेली

आई जगदंबेचा उदो उदो

आई भवानी मातेचा उदो उदो

आई दार उघड आई दार उघड

|| पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय ||

|| धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय ||

|| भारत माता की जय ||

|| हिंदू धर्म की जय ||

अशा गर्जनेत निघालेल्या या दौडीत भगव्या ध्वजाच्या रक्षणासाठी प्राणाची बाजी लावणाऱ्या बाजी, तानाजी, फिरंगोजी नरसाळे, मुरारबाजी, प्रतापराव गुज्जर, असामान्य त्याग करणारे शिवा काशीद यांच्यासारख्या तमाम वीरांचा जयघोष करत, प्रत्येक मावळा अभिमानाने छाती फुलवत आजच्या हिंदू धर्माच्या वारसांच्या डोळ्यात अंजन घालत होता.

भारत हिंदुस्तान है

हिंदू ओंकी शान है

हे वचन रक्तात भिनवणारी हि दौड म्हणजे राष्ट्राला आणि अटकेपार झेंड्याला मुजरा करणारी दौड ठरली.

“महामंत्र आहे नव्हे शब्द साधा |

जयांच्या स्मृतीने जळे म्लेंच्छबाधा

नुरे देश अवघा जायचे अभावी |

शिवाजी जपू राष्ट्रमंत्र प्रभावी”

शिवरायांसारखं रत्न या भारतभूमीला लाभण, या महाराष्ट्राच्या मातीत जन्माला येण हि साधी सोपी गोष्ठ नाही. हा एक ज्वलंत इतिहास पराक्रमाचा, आई भवानीच्या आशीर्वादाचा, या सह्याद्रीचा आणि सह्याद्रीत छातीची ढाल करणाऱ्या मावळ्यांचा.

पुन्हा शिवाजी जन्माला यावा अस प्रत्येकाला वाटत असेल तर, हिंदूधर्म रक्षण करण गरजेच आहे. इतिहासातला शिवराय अजूनही जिवंत आहे आणि सूर्य चंद्रा सोबती जिवंतच राहील आणि तो आजच्या तरुण, बाल दोन्ही पिड्यांच्या नसानसांत आपल्याला पोहचवायचाय

आणि याच शपथेवर आज संपूर्ण महाराष्ट्रात देशभरात दुर्गामाता दौड होणे जरुरी आहे.

गुरुवर्य भिडे गुरुजी म्हणतात….

आज पुन्हा आपणाला या भारत भूमीला श्री.शिवाजी महाराजांची गरज आहे.आपले सारेच नेते नाकर्ते आहेत हे आपल्याला हि ठावूक आहेमग ह्या राष्ट्राप्रती आपल काही देण लागत का नाही?रोग होवू नये यासाठी ईलाज करावा लागेल म्हणजे,,,,,आपल्यात जिजामाता जागवावी लागेल राजे शहाजी जागवावे लागतील,,,तर आणि तरच देशाचा आणि पर्यायाने आपलाआपल्या मुलाबाळांच उज्ज्वल भवितव्य घडवता येईल,,,,,,
लक्षात ठेवा छत्रपतींच्या सारखा नेता लाभला तर शेळ्या मेंढ्यांच लाचार जीण जगणारी हि प्रजा तिने महाराजां नंतर हि औरंगजेबास जेरीस आणल,,,,,,अटकेपार भगवा फडकवला.
तेव्हा या सारे सारे या या दौडीत सामील व्हामहाराजांचा एक तरी अंश आपल्यात यावा अशी प्राथना आई भवानीला करा बघा नक्की ती पुन्हा तुमच्या हाकेला ओ देईल,,,
“एक शिवाजी महाराज  जर ईतक काही करू शकतात तर आपणात
प्रत्येकात एक शिवाजी जन्माला आला तर काय होईल विचार करा..!”

कधी शत्रूचे घाव ना पाठीवरती |
रणी झेलतो सिंहासा छातीवरती ||
हाकारूनी आव्हानतो जो यमाला |
मराठा म्हणावे अशा वाघराला ||

दिला एकदा शब्द न पालटावा |
पुढे टाकलेला पाय मागे न घ्यावा ||
धरे जो स्वयंभू शिवाजी पथाला |

मराठा म्हणावे अशा वाघराला ||

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
आमच्या टेलिग्राम ग्रुप वर सभासद व्हा. इथे तुम्हाला इतर वाचक आणि लेखकांशी संवाद साधता येईल. telegram channel