एकदा काही कोळी नदीत जाळे टाकून मासे धरीत होते. त्यांनी पुष्कळ वेळा प्रयत्‍न केला पण चांगलेसे मासे त्यांना मिळाले नाहीत. शेवटी त्यांनी पुन्हा एकदा जाळे टाकले व ते वर उचलतांना इतके जड लागले की, त्यात भलामोठा मासा असावा असे त्यांना वाटले. पण जाळे वर ओढून पहातात तो त्यात एक मोठा दगड व अगदी थोडे बारीक मासे त्यांच्या दृष्टीस पडले. त्यांना फार वाईट वाटले; तेव्हा एक कोळी म्हणाला, 'मित्रांनो, सुख आणि दूःख ही जुळी भावंड आहेत. त्यापैकी एक आलं की त्याच्यामागून दुसरं आलंच म्हणून समजावं.'

तात्पर्य

- सुखदुःखं मनुष्यमात्राच्या मागं लागलीच आहेत. त्यापैकी एक आले की त्याच्यामागून दुसरे आलेच म्हणून समजावे.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
आमच्या टेलिग्राम ग्रुप वर सभासद व्हा. इथे तुम्हाला इतर वाचक आणि लेखकांशी संवाद साधता येईल. telegram channel