पिंगळा नावाचा पक्षी भूतभविष्य जाणतो असे म्हणतात. त्याच्या ओरडण्याच्या आवाजावरून काही बर्‍यावाईट कल्पना लोकांनी ठरविल्या आहेत.

एकदा एका कावळ्याने त्याच्या आवाजाचे नीट निरीक्षण केले व तोही लोकांच्या डोक्यावरून तसे ओरडत निघाला. तो आवाज ऐकून खालून चालणार्‍या माणसांनी आश्चर्याने वर पाहिले व तो ढोंगी कावळा दिसताच त्याच्याकडे उपहासाने पाहात ते चालते झाले.

तात्पर्य

- नुसत्या पोशाखाने आणि हावभावांनी माणसाला पात्रता येत नाही. ती उपजतच असावी लागते.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
आमच्या टेलिग्राम ग्रुप वर सभासद व्हा. इथे तुम्हाला इतर वाचक आणि लेखकांशी संवाद साधता येईल. telegram channel