को नु राजन्निन्द्रियवान्मुकुन्दचरणाम्बुजम् ।

न भजेत्सर्वतोमृत्युरुपास्यममरोत्तमैः ॥२॥

ऐकें बापा नृपवर्या । येऊनि उत्तमा देहा या ।

जो न भजे श्रीकृष्णराया । तो गिळिला माया अतिदुःखें ॥३०॥

ज्या भगवंतालागुनी । माथा धरुनि पायवणी ।

सदाशिव बैसला आत्मध्यानीं । महाश्मशानीं निजवस्ती ॥३१॥

पोटा आला चतुरानन । इतरांचा पाडु तो कोण ।

देहा येवोनि नारायण । न भजे तो पूर्ण मृत्युग्रस्त ॥२२॥

त्यजूनि परमात्मा पूर्ण । नाना साधनें शिणती जन ।

त्यासी सर्वथा दृढबंधन । न चुके जाण अनिवार ॥३३॥

सांडूनि श्रीकृष्णचरण । इंद्रादि देवांचें करितां भजन ।

ते देव मृत्युग्रस्त पूर्ण । मा भजत्याचें मरण कोण वारी ॥३४॥

असोनि इंद्रियपाटव पूर्ण । जो न भजे श्रीकृष्णचरण ।

त्यासी सर्वत्र बाधी मरण । क्षणक्षण निर्दाळी ॥३५॥;

तो नारद महामुनीश्वरु । मुक्त होऊनि भजनतत्परु ।

द्वारके वसे निरंतरु । श्रीकृष्णीं थोरु अतिप्रीति तया ॥३६॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel

Books related to श्रीएकनाथी भागवत


श्रीएकनाथी भागवत