"श्रीमंत" माझ्या व्याख्याच वेगळ्या आहेत श्रीमंतीच्या.

घरात रोज ताजी फळं  / फुलं असणं म्हणजे श्रीमंती. 

आज अवचित पाहुणा दारात आला आणि मी त्याला पोटभर जेवू घालू शकलो तर मी श्रीमंत आहे. 

माझी आठवण आली म्हणून एखाद्या मित्राचा, नातेवाईकाचा फोन आला तर  मी श्रीमंत आहे. 

कुणीतरी अडचणीत आहे, मदतीसाठी माझी आठवण आली तर  मी श्रीमंत . 

कुणाचे तरी विश्वास पात्र असणे म्हणजे श्रीमंती .

भर उन्हात फुललेला गुलमोहोर दिसावा म्हणजे नजरेची श्रीमंती. 

थंडीत मस्त बुचाची फुले आंगण भर पडवीत तर कधी पारिजातकाचा सडा पडावा आणि त्याच्या सुगंधाने माझं अंगण भरून जावं ही माझी श्रीमंती.


होय मला अशीच श्रीमंती हवी आहे. 

अशी श्रीमंती आपल्या सर्वांना लाभावी. 

असे अनेक क्षण आपल्या आयुष्यात यावेत आणि मुख्य म्हणजे आपल्याला ते जगता यावेत .  

आपल्या आसपास भरपूर माणसं असावीत आणि आपण खरंच श्रीमंत व्हावे...संकष्टी च्या संतुष्ट शुभेच्छा
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel