अहमदशहा अब्दाली युद्धात जिंकला असला तरी स्वाऱ्या करण्याच्या त्याच्या स्वभावामुळे त्याने त्याची सगळी संपत्ती गमावली होती. पानिपतात विजय मिळूनही त्याली फारशी खंडणी मिळाली नाही. मराठ्यांचे हत्ती, घोडे आणि युद्धकैदी यांच्याव्यतिरिक्त काहीच त्याच्या हाती लागलं नाही. अशात अब्दालीच्या बाजूने लढणारा बलुचिस्तानचा त्यावेळचा शासक मीर नासीर खान याने अब्दालीकडे मोबदला मागितला. अब्दाली कफल्लक झाला होता. त्याच्याकडे देण्यासारखं काहीच नव्हतं म्हणून शेवटी त्याने मराठा युद्धकैद्यांनाच मीर नासीर खानाच्या हवाली केलं.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.