अथर्ववेद हा चार वेदांपैकी एक वेद आहे. या वेदात विविध प्रकारचे अभिचारमंत्र म्हणजे जारणमारणमंत्र आणि इतर जादूचे मंत्र मोठ्या प्रमाणावर संगृहीत केले आहेत. ह्यातील बहुसंख्य ऋचांचा साक्षात्कार अथर्वन् नामक ऋषीला झाल्यामुळे ह्या वेदास अथर्ववेद हे नाव प्राप्त झाले, असे म्हटले जाते. अथर्वन् म्हणजे मनुष्यजातीस उपकारक ठरणाऱ्या पवित्र जादूचे मंत्र.