पुराणांनी जंबुद्वीपातील इलावृत्तवर्षांत असलेला मेरु पर्वत ही पृथ्वीची नाभी मानली आहे. पृथ्वीवर जम्बुद्वीप वगैरे सात द्वीपे असून प्रत्येकाभोवती एक समुद्र आहे, अशी पौराणिक कल्पना होती.भारत वर्षांचे नऊ खंड मानले आहेत. पर्वतांचे वर्षपर्वत व कुलपर्वत असे दोन प्रकार पाडले आहेत.विविध.प्रकारे समीकरणे मांडण्याचा प्रयत्न विद्वानांनी केला आहे. त्यातील काही उदाहरणे पुढीलप्रमाणे
- पुराणांतील मय-असूर म्हणजे मेक्सिकोतील 'मय' लोक
- पुराणांतील आस्तिक या शब्दापासून मेक्सिकोतील 'अजटेक' लोकांचे नाव तयार झाले
- असुरदेश म्हणजे ॲसीरिया
- बर्बरदेश म्हणजे बॅबिलोनिया
- रम्यकवर्ष म्हणजे इटली
- इक्षुसमुद्र म्हणजे काळा समुद्र
- स्कंदनाभी म्हणजे स्कँडिनेव्हिया
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.