प्रागितिहास, आद्य ऐतिहासिक युग आणि इतिहासयुग असे तीन प्रमुख टप्पे मानले जातात; परंतु या तीन टप्प्यांची मांडणी एकोणिसाव्या शतकाच्या मध्यकालापर्यंत योजली गेली नव्हती. याचे कारण असे की यूरोपमध्ये एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीच्या काळापर्यंत जगाची व मानवाची प्राचीनता पाषाणयुगाइतकी असेल, असे कुणालाच वाटले नाही. अश्मयुगासंबंधी जसजसा पुरावा उपलब्ध झाला, तसतसे या युगाचे उपकाल अथवा उपखंड योजणे अपरिहार्य ठरले.