मी लहानपणी फार मातीत खेळायचो. नाचायचो, हुंदडायचो. रानवा-याच्या रानशीळा ऐकत बेधुंद होऊन फिरायचो. रानमेवा शोधत भटकायचो. वादळ आलं की डोळ्यावर हात ठेऊन स्तब्ध ऊभं रहायचो. ढगांसोबत धावायचो... अविरत बरसणा-या आषाढ सरींसारखं मनसोक्त गावभर विहार करायचो...गढूळल्या पाण्यात कागदाची नाव चालवायचो...दुस-यांच्या नावेला दगड मारायचो..

नदीच्या पूरात वाहणा-या झाडाझुडपांच्या हेलकाव्यांसोबत मनाने हिंदाळायचो... ओंडका होऊन खळाळणा-या पाण्यात डुंबायचो.....
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
आमच्या टेलिग्राम ग्रुप वर सभासद व्हा. इथे तुम्हाला इतर वाचक आणि लेखकांशी संवाद साधता येईल. telegram channel