सुमन कळ्यांचा हार । सखे आज लेईल सखा सुकुमार
सखा गुणिराज राजबनसी । अलबेला मतवाला हौशी
नूतन वय दिव्या देह खासी । जरी पोषाक लेवीन त्यासी
करिन आदर उपचार । सखे आज लेईल सखा सुकुमार ॥१॥
उंच वस्त्र जैनाबादी । अष्टी पेटी पदर साधी ।
वसंती रंग आणा आधीं । गंध मृगमद केशर आदी ।
अतराचे लईकार । सखे आज लेईल सखा सकुमार ॥२॥
लेवी जडिताचीं लेणीं । तबकीं, तोषवीन पक्कान्नीं ।
तबक चौफुले साहित्यानीं । दीप प्रकाश रमणिक स्थानीं ।
शेज केली गुलजार । सखे आज लेईल सखा सुकुमार ॥३॥
विलासी नार मनीं भार्या । तोषऊन भोगित (गुणिराया ) ।
गुणि गोविंदराव पाहुन चर्या । मल्हारी सांगतसे परी या ।
बहिरू बापू छेबदार । सखे आज लेईल सखा सकुमार ॥४॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
आमच्या टेलिग्राम ग्रुप वर सभासद व्हा. इथे तुम्हाला इतर वाचक आणि लेखकांशी संवाद साधता येईल. telegram channel