राजिवनयना तूं राघू, मी मैना, मजवरि कां रुसला ? ॥धृ०॥

पदरीं पडले दासी, चरणी जडले, अर्जी मी करते । आज सापडले मंजुळ मैना बोले ह्रदयासी धरते । नेत्र चढले, तुमच्याविण मी अडले, भोगावें पुरते । सोड कल्पना, केली माझी दैना, कपटी आज दिसला ॥१॥

राजींद्र धनी चवसर खेळूं, बसोनी उभयता ठरा । द्या डाव गुणी फासा धर पाहेनी (?) मजवर मेहर करा । अज्ञानपणीं केली म्या मनधरणी कर मशीं इष्क पुरा । केल्या पैना, भुलले तुमच्या वदना, आज मंदिरीं चला ॥२॥

संगिन जोडा, भ्रांत मनाची फेडा, पलंगीं आज बसा । प्रीतीचा तडा, राग मनांतिल सोडा, मजवर मेहर करा । मुखी घ्या हो विडा । नहि तुमचा ताडा (?) पुतळी आज कसा । येउं द्या करुणा अर्जी माझी माझ्या कमळिणिच्या फुला ॥३॥

रंगीत महालीं सेज सुवासिक केली, साजण धनी हातीं । लंपट झाली अशा प्रीतीच्या चाली, भोगी यकांतीं । मर्जि मिळाली । रामा गुणिजन ख्याली च्याहाती अतिदतीं । लब्धले गुणा, साक्ष पंढरिराणा, देह हा तुला दिला । राजिवनयना ॥४॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
आमच्या टेलिग्राम ग्रुप वर सभासद व्हा. इथे तुम्हाला इतर वाचक आणि लेखकांशी संवाद साधता येईल. telegram channel